वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

बळे डाई न पडे हरी ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-079898 · अभंग क्र. ३६९७

3697.
बळे डाई न पडे हरी । बुद्धि करी शाहणा तो ॥१॥
मोकळे देवा खेळो द्यावे । सम भावे सांपडावया ॥धृपद॥
येतो जातो वेळोवेळा । न कळे कळा सांपडती ॥२॥
तुका म्हणे धरा ठायींच्या ठायी । मिठी जीवे पायी घालुनिया ॥३॥

अर्थ :
परमेश्वर बळेच दुराग्रहात सापडनार नाही. आपल्या बुद्धिकौशल्याने जो वागेल, तो शहाणा. देवाला मुक्तपणे खेळूद्यावे तो सर्वव्यापी आहे;व समभावाने तो सापडतो. तो वारंवार येतो आणि जातो. त्याला शोधन्याची युक्ती केली तरी तो कोणाला सापडला नाही. तो आवतार कार्‍याने येतो आणि तेथिल कार्य संपले की नव्या आवतारात प्रविष्ट होतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या जीवाची मीठी त्याच्या पायावर घाला आणि आहे तिथेच त्याला धरा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग