या रे करू गाई । जमा
3740.
या रे करू गाई । जमा निजलेती काई । बोभाटाने आई । घरा गेल्या मारील ॥१॥
घाला घाला रे फुकारे । ज्याची तेणेचि मोहरे । एवढेंचि पुरे । केलियाने सावध ॥धृपद॥
नेणोनिया खेळा । समय समयाच्या वेळा । दुश्चिताजवळा । मिळालेति दुश्चित ॥२॥
तुका म्हणे शीक । न धरिता लागे भीक । धरा सकळीक । मनेरी धावा वळतिया ॥३॥
अर्थ :
सवंगड्यानो, या झोपला काय रे ? आपण इंद्ररूपी गाई एकत्र करू या. गाई उधळल्या असा बोभाटा केला आणि जो तर मायारूपी आईला ऐकु गेला ती आपल्याला मारेल. गाईंना बोलाविन्यासाठी हाका मारा, ज्याची गाय असेल ती त्या हाकेने परत फिरेल. तू सावध केले तर एवढे काम पुरेसे होईल. योग्य काय, अयोग्य काय हे पाहुन खेळावे हे तुम्हाला कळत नाही. वाइटाशि खेळता आणि स्वतः वाइट होऊन बसता. तुकाराम महाराज म्हणतात, संगीतलेले निट ध्यानात ठेवा; नाहीतर भिक मागायची पाळी येईल. मनेरी (मनरूपी) गाय वळायला लागल्यास ति धावत सुटते, हे सर्वानी लक्षात ठेवावे.
