(अडसण अभंग)
3744.
(अडसण अभंग)
शुद्धीचे सारोनि भरियेली पाळी । भरडोनि वोंगळी नाश केले ॥१॥
आडसोनि शुद्ध करी वो साजणी । सद्धि का पापिणी नासियेले ॥धृपद॥
सुपी तोचि पाहे धड उगटिले । नव्हता नासिले जग झोडी ॥२॥
सुपी तोचि आहे तुज ते आधीन । दळिल्या जेवण जैसे तैसे ॥३॥
सुपी तोचि संग घेई धडफुडी । एकसा गधडी नास केला ॥४॥
दळिता आदळे तुज का न कळे । काय गेले डोळे कान तुझे ॥५॥
सुपी तोचि वोज न करिता सायास । पडसी सांदीस तुका म्हणे ॥६॥
अर्थ :
शुध्द परमार्थाचे दळण बाजूला सारुन एका विषयासक्त स्त्रीने आपल्या बुध्दीरुपी जात्याच्या पाळीमध्ये विषयरुपी घाण टाकून ते भरडून मनुष्य जन्माला येऊन देहरुपी भांडवलाचा नाश केला. हे सखे तू आत्मा आणि अनात्मा यांना सुपामध्ये घालून आडसून घे म्हणजे त्यांना निवडून शुध्द कर अगे हे पापीनी पूर्वीचा सिध्द असलेल्या आत्मस्थितीचा तू अविचाराने का नाश केला आहेस ? हे जगझोडी झोंड स्त्री तू जोपर्यंत तुझ्या हातामध्ये देहरुपी सूप आहे तोपर्यंतच याचा विचार करीत याचा फायदा करुन घे विनाकारण शुध्द अशा परमार्थाचा व आत्मस्थितीचा नाश करु नकोस. अगे जोपर्यंत तुझ्या हातामधे हा देहरुपी सूप आहे तोपर्यंतच तू चांगल्या कर्माचे दळण दळ नंतर तू तसे कर्म करशील त्याप्रमाणेच तुला सुख दु:खरुपी जेवण मिळेल. जोपर्यंत तुझ्या हातामध्ये नरदेहरुपी सूप आहे तोपर्यंतच त्याचा संग करुन तू तुझा फायदा करुन घे हे गधडे तू विनाकारण तुझ्या आत्मस्थितीचा शुध्द परमार्थाचा नाश का करुन घेतला आहेस ? तुझ्या बुध्दीरुपी जात्याच्या पाळयामध्ये विषयरुपी घाणेरडे दळण दळत असताना त्या पाळया एकमेका
