वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

येईल ते घेइन भागा ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-079430 · अभंग क्र. ३७४२

3742.
येईल ते घेइन भागा । नव्हे जोगा दुसरिया ॥१॥
आवडी ते तुम्ही जाणा । बहु गुणासारिखी ॥धृपद॥
मज घेती डांगवरी । सवे हरी नसलिया ॥२॥
तुका म्हणे राबवा देवा । करीन सेवा सांगितली ॥३॥

अर्थ :
माझ्या वाट्याला जेवढे दूध येईल तेवढेच मी घेइन. मी इतरांसारखी आसक्ति ठेवनार नाही. माझी आवड अंगी सदगुण असणार्यांवर अवलंबून आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाचे गुण पाहुन, त्या प्रमाणात भक्तिज्ञान वैराग्याचे दूध देत आहे. दूध देताना हरीचे जर साहाय्य नसते तर मला सर्वानी काठ्यानी मारले असते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला राबवून घ्या. कोणतेही काम मला सांगा ते मी करिन.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग