वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

बहु बरा बहु बरा । या

🙏 3. संत तुकाराम · ABH-079501 · अभंग क्र. ३७०१

3701.
बहु बरा बहु बरा । यासांगाते मिळे चारा ॥१॥
म्हणोनि जीवेसाठी । घेतली कान्होबाची पाठी ॥धृपद॥
बरवा बरवा दिसे । समागम याचा निमिषे ॥२॥
पुढती पुढती तुका । सोंकला सोंकवितो लोका ॥३॥

अर्थ :
हा कान्हा खूप चांगला खूप चांगला आहे याच्या संगतीनेच आम्हाला भरपूर खाण्यास मिळते. म्हणूनच आम्ही आमचे जीव अर्पण करुन आमच्या जीवावर उदार होऊन आम्ही कान्होबाच्या पाठीमागे लागलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, पुन्हा पुन्हा कृष्णाकडे जाऊन चांगले खाण्यास मी सोकलो आहे व लोकांनाही मी सोकवीतो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग