दादला ३७४२
3742.
दादला ३७४२
मोडकेसें घर तुटकेसे छप्पर । देवालादेवघर नाही ॥१॥ मला दादला नलगे बाई ॥धृ.॥ फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवायां दोरा नाही ॥२॥ जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी । वरतेलाची धार नाही ॥३॥ मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही ॥४॥ सुरतींचे मोती गुळधांव । सोने । राज्यांत लेणें नाही । एका जनार्दनी समरसझालें । तो रस येथे नाही ॥५॥
