माळी ३७३९
3739.
माळी ३७३९
आत्माराम आपण वनमाळी वो । ज्ञानकुदळी घेऊनि वाफेचाळी वो । जाई जुई लाविल्यादोन्ही ओळी वो । निज योगिनी शिपिती वेळोवेळीवो ॥१॥ पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वो । या मळ्याचेसारिखे चारी कोन वो । रक्षण तेथे ठेविले पांचजणवो । प्राणापान व्यान उदान समान वो ॥२॥ बावनपायऱ्या रे विहिर निर्धारी वो । सतत उपसा होतसेपरोपरी वो । ऐसी विहीर ओळती क्षीरसागरीवो ॥३॥ वोडवेचे चाक सत्रावी घडघडाट वो । सोहंदोर लाविला त्याला नीट वो । शांती क्षमेचीरहातेस मोट वो । निजनयना चालविला पाटवो ॥४॥ हाती खुरपें घेतलें विवेकाचें वो । समूळमूळ खुरपिलें वासनेचें वो । प्रत्यक्ष फळ लाधलेआत्म साचे वो । एका जनार्दन माळी तेथे नाचेवो ॥५॥
