वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

चला वळू गाई । बैसो ज

🙏 3. संत तुकाराम · ABH-079752 · अभंग क्र. ३७१७

3717.
चला वळू गाई । बैसो जेऊ एके ठायी ॥१॥
बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण ॥धृपद॥
खांदी भार पोटी भुक । काय खेळायाचे सुख ॥२॥
तुका म्हणे धावे । मग अवघे बरवे ॥३॥

अर्थ :
गोपाळ म्हणाले, "सवंगड्यानो, चला. आपण इंद्ररूपि गाईना अंतर्मुख करू आणि एके ठिकाणी बसून आनंदात जेवू. आत्तापर्यंत खुप वनवन झाली. पयपिट करून फार शिण आला आहे. खांद्यावर भार आणि मनात सुखाची भूक असताना संसाराचा खेळ खेळण्यात काय सुख आहे?. तुकाराम महाराज म्हणतात, गडयांनो, आता जेवनाची घाई करा. त्यातच आपले कल्याण आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग