वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

अनंत ब्रम्हांडे उदरी

🙏 3. संत तुकाराम · ABH-079335 · अभंग क्र. ३७२१

3721.
अनंत ब्रम्हांडे उदरी । हरी हा बाळक नंदा घरी ॥१॥
नवल केवढे केवढे । न कळे कान्होबाचे कोडे ॥धृपद॥
पृथ्वी जेणे तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥२॥
विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥३॥
तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रम्हचारी ॥४॥

अर्थ :
अनंत ब्रम्हांडज्याच्या उदरामध्ये आहे, असा हा श्रीकृष्ण नंदाघरि बालरूप घेऊन खेळतो आहे. या बालहारीचे मोठे नवल आहे, याचे कोढे काही केल्या सुटत नाही. जो सर्व पृथ्वीला तृप्त करो त्याला सगुण रुपात, गोकळात यशोदा भोजन देते. हा कमलापति सर्व विश्वाला व्यापूण राहिला आहे; परंतु गौळणी याल सगुण रुपात आपल्या कडेवर घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, हा मोठा नटधारि आहे गोपिणी संगे सर्व सुख भोग भोगुनही आपण ब्रम्हचारी राहिला आहे, हे केवढे आच्छर्य आहे !.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग