डोंबारी ३७३४
3734.
डोंबारी ३७३४
लगे ढोल लगे ढोला जरी तुझा वस्तादखोल । तरीच मशीं बोल । नाही तरी वाया फोला
जाईजाईरेगव्हारा ॥१॥ मी निराकाराचा डोंबारीतिही लोकी माझी फेरी । चार युगांच्या खबरी । तज सांगेन रेगव्हारा ॥२॥ प्रथमखेळ कैलासगिरी।वेळ रोविला निर्धारी । शंभु राजा राज्य करी । त्याचे उदारत्व भारी । तुज सांगेन रे गव्हारा ॥३॥ आत्मलिंग आणि पार्वती । ती दिधली दशकंधराप्रतीत्याच्या उदारत्वाची ख्याती । नाही नाही त्रिजगतींधन्य त्या शंभुची याद कर ॥४॥ दुसरा खेळ वैकुंठीश्रीमंत महाराज विष्णुजगजेठी । तेणे दैत्य मारिलेंकपटी । क्षीरसागर तटी रहिवास केला । धन्य त्याविष्णुची याद कर ॥५॥ अवतार धरिले मच्छ कच्छवराह नारसिंह वामन फरशधरा । तिसरा खेळअयोध्यापुरा । धाक दराराशत्रुसी । धन्य त्या विष्णुचीयाद कर ॥६॥ सुर्यवंशी राजेभले । शिभिने मांसदान केले । वैकुंठनाथा संतोषविले । नगर नेलेंमोक्षाप्रती । धन्य त्या शिभ्रीची याद कर ॥७॥ तैसाची हरिश्चंद्र राजा पुण्यराशी । राज्य देऊनीब्राह्मणासी । आपण जाऊनी वाराणशी । पुत्रपत्नीशीं विकीलें । धन्य त्या हरिश्चंद्राची यादकर ॥८॥ दैत्यवंशी राजा बळी । तेणे तप्त केलावनमाळी । देहवान देऊनी पाताळी । देवआपणाजवळी ठेविला । धन्य त्या बळींची याद कर ॥९॥ राजा अजपाल भगीरथा दशरथवंशीजन्मलेरघुनाथ । त्याच्या औदार्याची मात । पहातांवेदशास्त्र शिणले । धन्य त्या रामाची याद कर ॥१०॥ त्या खेळाचा नवलाहो । देवा नकळेअभिप्रावो । वेदा श्रुतींशी नवलावो । अगम्य पहाहोसनकादिकां । धन्य त्या श्रीकृष्णाची याद कर ॥११॥ ऐसा गुलाबराव महाबळी । तेणेभल्याभल्याशी केली रळी । खेळ मांडीला गोकुळी । कृष्ण वनमाळी खेळत । धन्य त्या कृष्णाची यादकर ॥१२॥ तसरीपा दिधल्या अमुप । त्यासी नाहींपुनरावृत्तींचे माप आपण राहनी साम्यप । रुपारुपमेळविलें । धन्य त्या महाराजांची याद कर ॥१३॥ पुढे द्वापारयुगाचा उदयो । म्या बरोबर घेतिलाकामाजी गुलाबरावो । तेणे ठकविले मोठेमोठे पहाहो । तुज सांगेन रे गव्हारा ॥१४॥ नारदासी डोळाघातिला । विश्वमित्र फारच नागविला । पराशर वस्त्रटाकुनि पळाला । लबाडी नव्हे माझिया बोला । तुजसांगेन रेगव्हारा ॥१५॥ ब्रह्मयाची घेतली लंगोटी । इंद्र पळाला कपाटीं । चंद्रासी काळोखी मोठी । अद्यापी जन दृष्टी । पहाती रे गव्हारा ॥१६॥ पुढेकलियुगा माझारी । भुवैकुंठ श्रीक्षेत्र पंढरी । पुंडलिकपाटलांचे द्वारी । खेळ जोडीला लवकरी । मागितलाधन्य त्या पुंडलिक पाटलाची याद कर ॥१७॥ नगरांत डोंबारी आले । उदंड खेळ खेळोनी गेले । परी पुंडलिक भाग्य श्री विठ्ठले । न कळे ऐश्वर्यकोणासी । धन्य त्या पुंडलिक पाटलाची याद कर।१८॥खेळ खेळतां अंग हारपलें । चित्त मन उन्मनझालें । कीर्तनसुखें निवालें । एका जनार्दनी ऐसे केले- धन्य त्या श्रीविठ्ठलरायांची याद कर ॥१९॥
