वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 148. आंधळा ३७१० ते ३७१२

आंधळा ३७१० ते ३७१२

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084604 · अभंग क्र. ३७१०

3710.
आंधळा ३७१० ते ३७१२

मार्ग बहु असती परी तयांची न येकळे गती । म्हणोनि पडियेलों माया मोहभ्रांती । =तेणे मी जाहलों अंध कोण धरील चित्ती । मारितों हांका मोठ्याने अहो उदार श्रीगुरुमूर्ति ॥१॥ धांव धांव श्रीगुरुराया काढी देउनी हात । बुडतसेभवनदीमाजी न कळे अंत । शिण बहु मजजाहला श्रमलों पाहत पाहत । यांतुनी सोडी वेगींतुम्हां श्रीगुरु समर्थ ॥२॥ वाटे आडवाट दरीदरकुटे यांमाजी गुंतले । कन्या पुत्र स्त्रीधन हे वरपडिलें जाळं । कवण उगवील कवणा शरण । जाऊ ते न कळे । करितो चिंता हृदयी तंव श्रीगुरुभेटले ॥३॥ मार्ग हा दाविला जेथे नाही गोंवागुंती । श्रीगुरु प्रसन्न जाहले निवारली अवघी भ्रांती । एका शरण जनार्दनी जाहली संतोषवृत्ती । अंधपण । फिटले निवारली पुनरावृत्ती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग