मी वासुदेव नामे फोडि
3708.
मी वासुदेव नामे फोडितो नित्यटाहो । देखिले पाय आता मागता दान द्याहो । सांवळे रूप माझ्या मानसी नित्य राहो । पावनसंतवृंदें सादरे दृष्टी पहा हो ॥१॥ रामकृष्णवासुदेवा । हरिरामकृष्ण वासुदेवा ॥धृ.॥ सांडोनीसर्व चिंता संतपदीं लक्ष लागो । भक्त मी सर्वसंगीसर्वदा वृत्ति जागो । भाविक प्रेमळांच्या संगतीचित्त लागो ॥२॥ अद्वैतेंची चालो अक्षयीं भक्तियोग । स्वप्नींही मानसातें नातळों द्वैतसंग । अद्वयानंद वेधेनावडो अन्य भोग । अक्रियत्वची वाहो सक्रियारूपबोध ॥३॥ पाहता विश्वमाते निजरूप दाखवी । सत्कथा श्रवण कर्णी पीयूष चाखवी । रसनेनाममंत्र सर्वदा प्रेम देई । तोषला देवराणा म्हणेबारे घेई ॥४॥ हे दान पावले सद्गुरु शांतिलिंगा । हे दान पावले आत्मया पांडुरंगा । हे दान पावलेव्यापका अंतरंगा । हे दान पावले एका जनार्दनींदोष जाती भंगा ॥५॥
