मृत्यूलोकी एक नगर त्
3714.
मृत्यूलोकी एक नगर त्यांचे नांवपंढरपूर । तेथील मोकाशी उभा असे विटेवर ।
पुंडलीक भक्तराज शोभे चंद्रभागातीर । बोलती
साधुसंत जीवा वाटेहुरहुर ॥१॥ तुम्ही संतमायबाप
एवढा उपकार करा । न्या मज तेथवरी । दाखवा
दीनांचा सोयरा ॥धृ.॥ मज नाही हातपाय डोळां
पडली झापड । कर्णबधीर झाले वाचा बोले बोबड ।
नाकमुख गळूलागलेलाळ आणि शेंबुडाश्वानापरी
गती जाली अवघे करिती हाडहाड ॥२॥ साधुसंत
मायबापजे का दयेचे सागर । भावाचें मुख्य स्थान
भक्तीचें माहेर । तिही केले कृपादानमस्तकी ठेविला
कर । माया मोह निरसली शुद्ध जाले कलेवर ॥३॥
भाव दिला मजसांगाते मार्गदाविला नीट । भ्रांती हे
समुळ गेली दिसू लागली वाट । नाचत प्रेमछंदेंचालू
लागलो सपाट । एका जनार्दनी पावलोपंढरीपेठ ॥४॥
