दिवटा ३७३१
3731.
दिवटा ३७३१
जागे जागे या वाडियामध्ये जागे । यावाडिया बाहेर जागे । किती एक तळमळ करीत गेले
। हेचि खिंडाराचे खिंडार ॥धृ.॥ कोण्या गृहस्थाच्यावाड्या । कोण्या गृहस्थाच्या पेढ्या । लवकरी काढाबैसावया घोडा । करी या शब्दांचा आडा मोडा । तरीच लेकुराचा खेळ की रे रया ॥१॥ पैल लंकेचाचोहटा । तेथे मी एक बोलीलो दिवटा । तो रांडेचारावण म्हणे हा दिवटा खोटा । राक्षसावाणीच बोले ॥२॥ तेव्हा राम अवतरला त्याने एकचि खांडे । दहा शिरांची मुंडे । विसा भुजांची खांडे । त्या लंकेपुढेघोष मांडिले ॥३॥ आणखी त्या बायकोच्या छंदे । हिरण्यकश्यपाला फुटला फांटा । तो रांडेचा म्हणेहा दिवटा खोटा । मी म्हणे मरण नाही मला । तेम्हणे जीवेमारीन तुला । इतक्यामध्ये नरसोबाम्हणेअवतरला । डोळे फिरवीगरगरां । दांत खाय करकरां।कोंभा चकचक वला । हळु गांड्याळीचे द्वारी । देदान मज दिवट्याला । नाही तरी नागवसी याबोलाला । आणखी दानदेगावच्या जोशाला ॥४॥ तेणे विघ्न टळेल तुझे । मणपांच कणिकेचा दिवा । मध्ये मणपांचघृत । सोळा हातपासोडा । दीडतोळासोन्याचा माकोडा । ऐसे द्यावया दान । एक दाताजनार्दन । इतर लंडी काय देऊं जाणे । एकाजनार्दनाचा दिवटा । भक्तीच्या वसविल्या पेठा । सायुज्यताची नरदेही ॥५॥
