वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

नेणो वेळ काळ । धालो

🙏 3. संत तुकाराम · ABH-079486 · अभंग क्र. ३७१८

3718.
नेणो वेळ काळ । धालो तुझ्याने सकळ ॥१॥
नाही नाही रे कान्होबा भय आम्हापाशी ।
वळूनि पुरविसी गाई पोटा खावया ॥धृपद॥
तुजपाशी भय । हे तो बोलो परी नये ॥२॥
तुका म्हणे बोल । आम्हा अनुभवे फोल ॥३॥

अर्थ :
हे परमेश्वरा देवा, तुझ्या सहवासात किती आणि कसा वेळ गेला आम्हाला कळाल नाही. कान्होबा, आता आमच्याजवळ थोड़ेसुद्धा भय राहिले नाही. गाईला वळवून तू पोटभर खायला दिलेस. गाई वळून झाल्यावर 'भय' आहे, असे म्हणणे योग्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या संगती भय नाहीच, उलट सुख आहे. आम्ही याचा अनुभव घेतला आहे; त्यामुळे इतरांचे बोलने व्यर्थ आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग