कैकाई ३७३५
3735.
कैकाई ३७३५
श्रीकृष्ण माया जी पाहे । तै मी झालेंकैकाय । कैकाय देवाचे अंग । कैकाय झाले जग । कर्म ब्रह्मरे विभाग । त्यापासोनी कळो आम्या ॥१॥ गोरी आईओआम्या । सावळाई ओ आम्या । बरव्या नामाची वो आम्या । बरव्या रुपाची ओ आम्या । शुळगुळाई ओ आम्या ॥२॥ मत्साई वो कत्साई वो वराई वो नरसाई वो । वामनाई वो ठेंगणाई वो । परसाई वो रामाई वो । कृष्णाई वो बोधाई वो । काळकाई वो आम्या ॥३॥ गंगाई वो भागाई वो । रेणुकाई वो गडबडाई वो । चांगुणाई वो तुकाई वोआम्या ॥४॥ काय तुझ्या भयाचें साद पाहे । सांगणेबोलणे न चले वो माये । तुझ्या जीवींचे सांगेन । तुंजे पुससील ते सांगेन । तुझ्या मनींचे सांगेन । जेंसप्त पाताळाखाली ते तुंच तुजमाजी । तेचमजमाजी । कायधमक घेऊनी बसलीस गेधमकटी।तुझ्या धन्याची आस करीन । की कांकडाची चाडधरिनाथु: तुझ्या तोंडावरी । थुः तुझ्या लोभावरी । शकुन सांगेन ते ऐक । कळीकाई वो आम्या ॥५॥ मागुंत्या बुरगुंडा । नीट केल्या बहुत रांडा । तैसीनव्हे मी कैकाय । निजज्ञान करंडा । कळीकाई वो.आम्या ॥६॥ नमो कानडी भाषा । केळीव शीघ्रता । शकुन केळी शकुन केळी साईयो नमो आर । सीड ।बीड आशा । बीड ह्याळावा । गन्मोड होउगे आम्या ॥७॥ गंदिने धनान्नें तमिन्ने गवीने हाडव्याण । आडाव्याडा मोहो शाईतुडा । काळा आईओआम्या11८॥नमो तैलंग दिशा । कच्छ कच्छ भाषा । सरावेंमुसळ लोपे । वो आम्या ॥९॥ मित्ती खन्नाळुकडयाळु । इनयाळु । खखठाये । काळी आई ओआम्या ॥१०॥ कैकाय कैकाय । शकुन सांगेन तेऐक । कैकाये कैकाये न कळे ब्रह्मादिका । कैकायवृत्ती खोटी । कैकाये कैकाये सत्य सांगेन गोष्टी । जीवाशिवा पडली मिठी । एका जनार्दनाच्या कोटी । कळीकाळ वो आम्या वो आम्या॥11॥
