तुझिये संगति । झाली
3705.
तुझिये संगति । झाली आमुची निश्चिंति ॥१॥
नाही देखिले ते मिळे । भोग सुखाचे सोहंळे ॥धृपद॥
घरी ताकाचे सरोवर । येथे नवनीताचे पूर ॥२॥
तुका म्हणे आता । आम्ही न वजो दवडिता ॥३॥
अर्थ :
हे भगवंत तुझ्या संगतिमुळे अंतःकरण अगदी निश्चिंत झाले आहे. कसली काळजी राहिलेली नाही. जे कधीही अनुभवले नव्हते, ते सुख सोहंळे आता आम्ही अनुभवले. घरात ताकाचे सरोवर आहे; तर येथे लोण्याचा पुर आला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता जरी तू आम्हाला हकलुन लावलेस तरीदेखिल आम्ही येथून जाणार नाही. तुझ्याच सहवासात राहणार.
