अगा ये परम शुभ ऐक ।
3730.
अगा ये परम शुभ ऐक । लाभ दिसे तो एका नांदतें धर्माचे घर । सद्विवेकाचे विवर । विवरांत विश्रांती थोर । अपार सुख ते ।॥१॥ ऐसा नरदेह परम सुखाचा । घे मज पिंगळयाची वाचा । मी संदेह सांगेन साचा । ऐकागा राजकुमरहो ॥२॥ डुग डुग डुग शंभु महादेवा । काशी विश्वनाथापंढरीचा विठोबा । कानड्या खंडेराया । दिगंबरादत्तात्रया । इतुके बोलता ठायां । परी ते एकचि यती ॥३॥ लडबड लडबड । नवनाथ सोरटी सोमनाथ।श्रीहिंगळजा भगवती । वीणा पुस्तकधारणी । येमुळ पिठींची । जिचेनी वस्तु महिमा साची । आदि । अंत भरले स्वतंत्र । म्हणोनी कारण वाचेसी । अत्यंतबोलत आहे ॥४॥ नमो परम पुरुष । जो भासनाआभास । जो स्वयंप्रकाश अखिल मुर्ती ॥५॥ जोवर्ण व्यक्ति हीन । दृश्यादृश्य दरुशन जाण । जोआदिमायेचे आवरण । अनादिसिध्द ॥६॥ धन्यधन्यतो सद्गुरु । जो साक्षात परब्रह्म अवतारु॥नामस्मरणे जगदुध्दारु । करी सदा ॥७॥ आतासमस्ता नमीत स्वानंदे । देही स्फुरलें स्वात्मसुखछंदे । डुलतां आपुलेनी आनंदे । सहजासहजीं ॥८॥ आधी एकाग्र करुनी मन । सांडी बध्द मुक्तीचाअनुमाना वृत्ती सदा समाधान । स्वरुपी असावी ॥९॥ हजार गोष्टीचीये परी । मज सरोद्याचा विश्वासधरी । अंती बोलणे वचनवरी । गोड लागे ॥१०॥ एक खटपट । एक तळतळ । एक वळवळ । एककळकळा परी तो अवघाची कोल्हाळ करिताती ॥११॥ तैसा नोहे मी पिंगळा । शब्दासहीत बोधसकळा । एका अनेकी नोहे वेगळा । शोधोनी पाहे । ।१२।दिसे बावन्नाची कडसणी । एका सुत्रे वोवीलेंमनीं । जैसे गंगेचे पाणी । निर्मळ वाहे सर्वदा ॥१३॥ पुर्व उत्तर दोन प्रत्यक्षाअक्ष होते का नेणे ॥१४॥ एक तृप्ती व्हावया । आणिक ग्रास घ्यावया । तरी तेआन ठाया । गेले न म्हणा ॥१५॥ तरी त्यांचे मुखेंइसे अर्थकांही । ज्ञात्यासी सांगता भरला नाही । विवेक । संचुनी ठायी । ऐका गा राजेनु ॥१६॥ नांव कायसा रायाचे । मेष की वृषभ की मिथुन की कर्क की सिंहकी कन्या की तुळ की वृश्चीक की धन की मकर की॥कुंभ की मीन । ऐका गा राज कुमरहो ॥१७॥ येवोया मेष तो कैसा । हुरळक हुसके थलतैसा । बुध्दीमंदरा विवेकलेशा । दैन्यवाणा सदाचा ॥१८॥ आता वृषभती बोलावा । प्रकृती बुध्दी आम्हा सवा । हानी लाभय नोहे ठावा । या गर्वराशी ॥१९॥ माया ईश्वर मिळोनीये । जैसे सुखावती दोन्ही । तरंगतेच पाणी । ज्ञानप्राप्तीदे मिथुन जाणावा ॥२०॥ अहं बुध्दीचे सर्वक । तोचिओळखावा कर्क । देहाभिमाना गर्क । कुवृत्तीसदाचा ॥२१॥ मद गज वनांतरी । धूर्त सिंहाचियेपरी । मोहे महिमा विस्तारी । ऐसी कन्या जाणावी ॥२२॥ बुध्दी सत्वाची साम्यता । प्रपंच परमार्थऐक्यता । स्थुळधारी देखता । तो सत्वाचा वोतीला॥२३॥जो कुर्वाळील कृपा करी । विषय शक्तीती नांगी मारी । फनका लागता दु:ख करी । तोमळीन वृश्चीक जाणावा ॥२४॥ शब्द कैसा तिक्ष्ण । हदयीं जैसा लागे बाण । मोडी भलत्याचे समाधान । तोचि धन ओळखावा ॥२५॥ एक होरी एक पोटी । सदा भोंवयासी घाली गाठी । मळीन देखे सर्व सृष्टी । तो मकर जाणावा ॥२६॥ नुचंबळे पुर्ण कुंभ । जोआत्मसाक्षात्कार स्वयंभ । तो प्रत्यक्ष जाणावा थोंब । ऐशी वृत्ती जाणावी ॥२७॥ सदा चंचळ चपळस्थिती । दृष्टी झेपावेती विवृत्ती । ऐसी मीनाची गती।आपुलेनि वर्ते ॥२८॥ एवं स्थिती मतिद्वये । प्रेमळेमनी ओळखुनी घ्यावे । ऐके सत्यव्रती भावे । नांवकाय रायाचे ॥२९॥ तुझिया बाळा देखो न शकेकाळा । भुरळ डोळ्याचा आंधळा । झडपोनी जातोत्याला । भिऊ नको घरी येऊ देऊं नको । मनमुष्टीमाजीं धरी । मी सांगेन तैसेची करी रेराया ॥३०॥ एके बोवाळुनी देई । साबण सरकी गाईचे शेण । तांबड्या गुंजा मुष्टीये एक लोन । तांबे नाणे कालवुनीतिहीं ठायी टाकी॥३१॥एकमती बोलुन जातो । जळी राखस्थळी राख । आपुला शेजार राख । पाजार राख । आब्रह्मस्तंब पर्यंत । रखरक्ष हुं फट्स्वाहा॥३२॥ही नंददेशींची विद्या खरी । तुझ्याबाळाचें विघ्न निवारी । कळकंटक दुर करी । मगनांदशिल स्वानंदे॥३३॥आतां बाळांचे नांव सांगेस्पष्ट । तुझिया पोटींची आत्मनिष्ठ । जेव्हा झालीओमप्रतिष्ठ । जावांई तो सुलक्षणी साळंकृत॥३४॥परी तो सत्वगुणाची राशी । सप्रेमता लावी रुची । निजवाक्यार्थ परम साची । महिमा इचीदेवगणी॥३५॥देवगणी असे । प्रकृती गुणीविषमशमा नसे । राक्षस गणी आशेषे । वोळखोनीघ्यावें॥३६॥आता घरधन्याचें नांव काय । केशवकी माधव की गोविंद । की विष्णु की प्रद्युम्न । कीपुरुषोत्तम की अधोक्ष की रामु । देव बुध्दीसंगेघटवावा । उतरले नांव घरधन्याचे॥३७॥जरी तोम्हणु काळानिळा । परि तो वर्णव्यक्ति वेगळा । दिठींचा चुकवोनी डोळा । दिसतो सोहळाघरधन्याचा॥३८॥नामे व्युत्पत्ती बोध । आपणघेतां शोध । उरला तो सोहंबोध । नामरुपें॥३९॥अगा बायको एक आहे । उगीच आदळी हातपाय । चोरुनी परघर जाये ती मोठी जगभ्याड होईराया॥४०॥प्रसिध्द जो अविवेक । तोचि जाण तिचालेक । सरळ वाढलासे फोक महाठकु॥४१॥चउथपंचमीचे आईतवारी । एक हळदीचा मुटकुळा करी । वोवाळुनी टाकी बाहेरी । तिहीसांजा॥४२॥एकघरचा माणुस वाकडे पायाचा । पिचक्या डोळ्याचा । लटक्या बोलाचा । त्यास क्षणी पतकरशीलत॥४३॥बापुडा नारदु पाहिला । घडीमध्येगाभणा केला । चंद्रासी कलंक लाविला । तयाचेनी॥४४॥शंकराचा झाला वीर्यपात ।रावणाचा करविला घात । विष्णु विचकुनी दांत । -वृंदा वृंदा वोसणतसे॥४५॥ब्रह्मा धांवे सरस्वतीमागे । इंद्रजाला सहस्त्र भगें । भस्मासुर भस्मजालावेगें । वाली निमाला रामबाणें॥४६॥आताधनघतदे कण । एक तोळा दे दान । दे मज़ नका करूंअनुमान । घे मज पिंगळ्याची वाचा॥४७॥कायदेतील कुडे । रितें अवघेचिं उघडें । खोटे नाटेलमुटे । अविवेकी॥४८॥अतिताची आशा हरे । दात्यांचे तो दुणे भरे । जे दिधले ते कल्पांती न सरे । ऐसे काही देईजे॥४९॥आजी धन्य पावलों सभा । जीवी जन्माची आली शोभा । कर जोडोनी राहीनउभा । महाव्दारी देवाचें॥५०॥एक छत्र्यांचे राणिवामोक्ष मोकाशी दिला गांव । जगविख्यात विश्वासीनाम । नाचेन आवडी गाऊंनी॥५१॥एका जनार्दनीं. संताचा लडिवाळा पोटी रिघोनी जाला बाळ । कपाकेली सर्वकाळ । अभय वर देउनी॥५२॥
