झालो आता एके ठायी ।
3739.
झालो आता एके ठायी । न वंचू काही एकमेका ॥१॥
सरलो हेंगे देउनि मोट । कटकट काशाची ॥धृपद॥
सोडोनिया गाठी पाहे । काय आहे त्यांत ते ॥२॥
तुका म्हणे झालो निराळा । आता गोपाळा देऊ बोभा ॥३॥
अर्थ :
कृष्ण आणि आम्ही आता एकरुप झालो आहोत यापुढे आम्ही एकमेकापासून वंचित राहाणार नाहीत. देहरुपी मोट आम्ही देऊन टाकले आहे आमचा देहभाव बाद झाला आहे त्यामुळे कटकट कशाची राहिली आहे ? अहंकाराची गाठ सोडून त्यामध्ये काय आहे ते पाहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्ही सर्वांपेक्षा वेगळे होऊन राहिलो आहोत आणि गोपाळाला हाका देऊ म्हणजे त्याचे नाम घेत राहो.
