वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 151. बहिरा ३७२०

बहिरा ३७२०

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085721 · अभंग क्र. ३७२०

3720.
बहिरा ३७२०

बहिरा झालों या जगी ॥धृ.॥ नाहींऐकीलें हरिकीर्तन । नाही केले पुराणश्रवण । नाहींवेदशास्त्र पठण । गर्भी बहिरा झालो त्यागुण ॥१॥ नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवाघडियेलीं । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रतें.असोनि त्यागीली ॥२॥ माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिलामागुता । बहिरा झालो नरदेही येता । एका जनार्दनी । स्मरेन आता ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग