वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

बहु काळी बहु काळी ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-079636 · अभंग क्र. ३७००

3700.
बहु काळी बहु काळी । आम्ही देवाची गोवळी ॥१॥
नाही विट देतो भाते । जेऊ बैसवु सांगाते ॥धृपद॥
बहु काळे बहु काळे । माझे पाघरे कांबळे ॥२॥
तुका म्हणे नाही नाही । त्याचे आमचे से काही ॥३॥

अर्थ :
आम्ही खूप काळापासून देवाची गोवळी सखे आहोत. ज्याला कोणत्याही प्रकारचा वीट नाही अशा प्रकारचा दही भात काला तो आम्हाला देतो व एकमेकांच्या सोबतच जेवण करतो. माझे घोंगडे खूप काळापासून तो पाघरत आहे. तुकाराम महाराज म्हणतात. अहो आमचे काहीच नाही आमचे काहीच नाही सर्व काही त्याचेच आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग