मेळउनि सकळ गोपाळ । क
3723.
मेळउनि सकळ गोपाळ । काही करिती विचार ॥१॥
जाऊ चोरू लोणी । आजि घेऊ चंद्रधणी ।
चला वेळ लावियेला अझुणी । एकाकरिता गडे हो ॥धृपद॥
वाट काढिली गोविंदी । मागे गोपाळांची मांदी ॥२॥
अवघाचि वावरे । कळो नेदी कोणा फिरे ॥३॥
घर पाहोनि एकाताचे । नवविधा नवनीताचे ॥४॥
रिघे आपण भीतरी । पुरवी माथुलियाच्या हरी ॥५॥
बोलो नेदी म्हणे स्थिर । खुणा दावी खा रे क्षीर ॥६॥
जोगवल्या वरी । तुका करितो चाकरी ॥७॥
अर्थ :
कृष्णने सर्व गोपाळ सवंगडिंना गोळा केले. सारे मिळून विचार करू लागले. गोपाळांनो, चला, गौळणीच्या घरी जाऊन मन तृप्त होईपर्यंत लोणी चोरून खाऊ. मित्रांनो, तुम्ही काय करीत आहात? विलंब का लावतात ? लवकर चला. कृष्णने वाट धकविलि. त्याच्या मागे सारे गोपाल निघाले. जो देव आपले स्वरुप दिसून देत नाही, तोच देव सर्वत्र सांचार करत आहे. स्वेच्छेने सर्व प्रकारचे खेळ खेळत आहे. ज्या ठिकाणी नवविधि भक्तीचे नवनीत आहे, असे एकाताचे घर पाहू. त्याने स्वतः माजघरात शिरुण भांड्याचा शोध घेतला. नवविधा भक्तीच्या लोण्याने भरलेली भांडी गोपाळांकडे दिली. खाताने तो कुणालाही बोलू देत नव्हता. 'गप्प रहा' असे सांगत होता, भक्तिरूपि लोणी खा आणि त्यावर ज्ञानरूपी दूध प्या. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तिरूपि लोणी मीही खाल्ले आहे आणि मी भगवंताची सेवाहि करीत आहे.
