वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 161. मानभाव ३७३६ ते ३७३८

मानभाव ३७३६ ते ३७३८

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086860 · अभंग क्र. ३७३६

3736.
मानभाव ३७३६ ते ३७३८

कामक्रोध आम्ही बांधोनियां पायी । मत्सर भेद अहंकार अव्हेरिला बाई ॥१॥ आम्हाभिक्षा वाढा कांही ॥धृ.॥ आशा मनशा तृष्णा यांचीकेली पायमोडी।कल्पना आदिभ्रांती इच्छा पायींघातली बेडी ॥२॥ महादेवाच्या सात पिढीसांगूनिया देऊं । सोन्यारुप्याचे देव आम्हीठेचोनियां खाऊ ॥३॥ भाव आणि भक्तिचागडबडगुंडा केला । एका जनार्दन पायी मानभावझाला ॥४॥

3737.
आता मानभाव झालो भिक्षा वाढाबाई।भिक्षा वाढा बाई ॥धृ.॥ मुळीचाचि मानभाव
वस्त्रं काळी केली । कोरके मागुन झोळी भरली । उलटी काठी धरली ॥१॥ सोन्यारुप्याचे देव आम्हीमोडूनिया खाऊ । शेंदराचे देव आम्ही दृष्टी न पाहू ॥२॥ एका जनार्दनी मानभाव झाला । झोळीवरतीझोळी ठेवुनी गडबड गुंडा केला ॥३॥

3738.
जाहलों आम्ही मानभाव । आमच्यादेही भोळा भाव ॥१॥ आम्हा दुजेपणा नाही । हांसू
खेळु भलते ठायी ॥२॥ जपूंसदा कृष्ण नाम । नाहीआणिकाचें काम ॥३॥ करु गडबडगुंडा । मारुंयमाचिया तोंडा ॥४॥ शेंदरे हेंदरे देवा तया कोणपूजीवाव ॥५॥ एका जनार्दनी ठाव । आम्ही झालोमानभाव ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग