अद्वैत द्वैतातीत लक्
3698.
अद्वैत द्वैतातीत लक्ष । जीवशिव तेथेंसाक्ष । ते आम्हा दिसे प्रत्यक्ष । गेले ध्येय ध्यानलक्ष ॥१॥ बाबा बाळसंतोष बाळसंतोष ॥धृ.॥ सोहं कोहं विराला नाद । गेला भेद तुटला छंद । अंगोअंगी वेधला वेध । तेणे जाहलो बोधाबोध ॥२॥ नुरेची कर्माची वासना । नाठवे द्वैताची भावना । छंदे छंद सद्गुरुचरणा । काया वाचा शरणजाणा ॥३॥ ध्याने ध्यान अखंड जाहलें । भुक्तीमुक्तीचे फेरे खुंटले । एका जनार्दनी ऐसे केले ।
जन्ममरणाचे बीज भाजलें ॥४॥
