बायला ३७४१
3741.
बायला ३७४१
बाय माझ्या बापाचा बायला झाला । गोडगोड लिंबच वाटुन प्याला । अठरा मुले झाली
त्याला ॥१॥ बाय माझे बापाने पोट फाडिलें पोटफाडीले ॥धृ.॥ माझा बाप करितो चाळे । गरवारझाला तिसरे वेळे । बाळ मांडीवर खेळे ॥२॥ माझाबापहि गुणकारी । सहा मुले झालींसे उदरी । टाकुनीगेला देशावरी ॥३॥ माझा बाप अविनाश । निर्गुणआला आकारास । एका शरण जनार्दनास ॥४॥
