अधिकाचा मज कांटाळा ।
3738.
अधिकाचा मज कांटाळा । तुम्हा गोपाळा संगति ॥१॥
काय नाही तुम्हापाशी । सकळांविशी संपन्न ॥धृपद॥
उद्वेगाचा नेघे भार । भागल्या सार पुरते ॥२॥
तुका म्हणे अधीर जिणे । नारायणे न करावे ॥३॥
अर्थ :
आम्ही तुम्ही गोपाळाच्या संगतित असलो की इतर गोष्टींचा कंटाळा येतो. हे देवा तुमच्या जवळ काय नाही? तुम्ही सर्वच बाबतीत संपन्न आहात. तुम्ही कोणत्याही उद्वेगाचा भार घेत नाही तुझ्याजवळ जो माझा श्रमपरिहार होतो तोच सर्व सार आहे देवा. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा माझे जीवन अधीर करू नकोस रे बाबा.
