वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(खेळावरील रूपके : टि

🙏 3. संत तुकाराम · ABH-079840 · अभंग क्र. ३७०९

3709.
(खेळावरील रूपके : टिपरी)
बाराही सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे ।
यतिस्पद राखो जेणे टिपरिया घाई । अनुहाते वाये मांदळा रे ॥१॥
नाचत पंढरिये जाऊ रे खेळिया । विठ्ठल रखुमाई पाहू रे ॥धृपद॥
सा चहू वेगळा अठराही निराळा । गाऊ वाजवू एक चाळा रे ।
विसरती पक्षी चारा नेणे पाणी । तारुण्य देहभाव बाळा रे ॥२॥
आनंद तेथिचा मुकियासि वाचा । बहिरे ऐकती कानी रे ।
आंधळ्यासि डोळे पागुळांसि पाय । तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे ॥३॥

अर्थ :
टिपरीच्या खेळात बारा किंवा सोळा संतरूपी गडयांचा आपण मेळ जमवु. भगवंत हा सतरावा गडी आहे. टिपर्यांच्या नादात तालबद्ध पदे राखु व मृदुंगातून ध्वनि निघत आहे. अरे, आपण खेळत, नाचत पंढरीला जाऊ. विठ्ठल-रूखुमाइचे दर्शन घेऊ रे. चार वेद, सहा शास्र, अठरा पुराणे यांत वर्णन केल्यापेक्षा ते वेगळे आहे त्याला गाऊ. भजन छंदात टाळ्या वाजऊ. अश्या आनंदात पक्षी चारा खाने विसरतात, तरुण वर्गहि देहभान विसरतो. तुकाराम महाराज म्हणतात, तेथे असा आंनद असतो की, त्यात मुका बोलू लागतो. बहिरा एकु लागतो. आंधळयाला दृष्टी प्राप्त होते. पागळयाला पाय येतात. वृद्ध लोक तरुण होतात रे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग