(दळण)
3714.
(दळण)
शुद्ध दळणाचे सुख सांगो । मानवत असे सईबाई ॥१॥
शुद्ध ते वळण लवकरी पावे । डोलविता निवे अष्टांग ते ॥धृपद॥
शुद्ध हे जेविता तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ॥२॥
शुद्ध त्याचा पाक शुद्धचीत्त चांगला । अविट तयाला नाश नाही ॥३॥
तुका म्हणे शुद्ध आवडे सकळा । भ्रतार वेगळा न करी जीवे ॥४॥
अर्थ :
हे सईबाई, शुद्ध आचरणपूर्वक हरिनामरूपी दळणाचे सुख किती व कसे असते म्हणून सांग ? ते आम्हाला मानवले नाही. असे शुद्ध दळन लवकर होते, दळणात अंग डोलू लागते, त्यामुळे अष्टांग शांत होते. जेवन जेवतांना विवेकरुपी इंधन कमी लागते. ते जेवण तन- मन शांत करते. जेवण (स्वयंपाक) शुद्ध व चांगला झालेला आहे. ते अविट आहे. त्याचा नाश नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जे शुद्ध असते ते सर्वांना आवडते. शुद्ध पाक तैयार करणाऱ्या स्त्रीला तिचा नवरा प्रेमपूर्वक, जीवाभावाने आपलेसे करतो, कधीच दूर लोटत नाही.
