वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

वळत्या गाई धावे घरा

🙏 3. संत तुकाराम · ABH-079625 · अभंग क्र. ३७०३

3703.
वळत्या गाई धावे घरा । आमच्या करी येरझारा ॥१॥
नांव घेता तो जवळी । बहु भला कान्हो बळी ॥धृपद॥
नेदी पडो उणे पुरे । म्हणे अवघेचि बरे ॥२॥
तुका म्हणे चित्ता । वाटे न व्हावा परता ॥३॥

अर्थ :
इतरत्र धावांर्‍या गाईंना हरी वळवितो. आमच्या घरी फेऱ्या मारतो. 'कान्होबा' म्हणताच तो जवळ येवून उभा राहतो. तो अतिशय बलवान आहे. आम्हाला तो काही कमी पडू डेत नाही. 'तुमचे सर्व ठीक आहे ना ? ' असे विचारतो. तुकाराम महाराज म्हणतात, तो आमच्या अंत:करणापासून दूर व्हावा असे आम्हाला वाटतच नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग