वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(खेळावरील रूपके : टि

🙏 3. संत तुकाराम · ABH-079593 · अभंग क्र. ३७१२

3712.
(खेळावरील रूपके : टिपरी)
भीमातीरी एक वसविले नगर । त्याचे नांव पंढरपुर रे ।
तेथील मोकासी चार भुजा त्यासी । बाइला सोळा हजार रे ॥१॥
नाचत जाऊ त्याच्या गांवा रे खेळिया । सुख देईल विसावा रे ।
पुढे गेले ते निघाई झाले । वाणितील त्याची सीमा रे ॥धृपद॥
बळिया आगळा पाळी लोकपाळा । रीघ नाही कळिकाळा रे ।
पुंडलीक पाटील केली कुळवाडी । तो झाला भवदुःखा वेगळा रे ॥२॥
संतसज्जनी मांडिली दुकाने । जे जया पाहिजे ते आहे रे ।
भुक्तिमुक्ति फुकाच साठी । कोणी तयाकडे न पाहे रे ॥३॥
दोन्हीच हाट भरले घनदाट । अपार मिळाले वारकरी रे ।
न वजो म्हणती आम्ही वैकुंठा । जिही देखिली पंढरी रे ॥४॥
बहुत दिस होती मज आस । आजि घडले सायासी रे ।
तुका म्हणे होय तुमचेनी पुण्ये । भेटी तया पायासी रे ॥५॥

अर्थ :
अरे, भीमा नदीच्या काठी एक नगर वसले आहे. त्याचे नांव पंढरपुर आहे. तेथील मोकाशाला चार हात सोळा हजार बायका आहे. अरे खेळीया, आपण त्याच्या गावाला नाचत नाचत जाऊ. तो आपल्याला सुख आणि विसावा, दोन्ही देईल. जे पुढे गेले आहेत, ते काळजीपासून मुक्त झाले. त्यांच्या तेथे काळीकाळाला प्रवेश नसतो. पुडंलिक पाटलाने त्याच्याशी कुळवाडि म्हणजे त्याची भक्ती केली आहे. तो भवदुःख पासून दूर झाला आहे. अरे, संतांनीही परमार्थचे दुकाने घातली. ज्याला जे हवे असेल, ते त्याला तेथे प्राप्त होते, भुक्ति- मुक्ति फुकटच मिळतात ; तरीही त्यांच्याकडे कुणीही पाहत नाही. अरे, पंढरित आषाढ़ी-कार्तिकेत खुप मोठे बाजार भारतात. असंख्य वारकरी तेथे जमतात. ते म्हणतात, आम्ही पंढरी पाहिली आहे त्यामुळे आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा नाही. तुकाराम महा

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग