वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

कामे पीडिलो माया । ब

🙏 3. संत तुकाराम · ABH-079822 · अभंग क्र. ३७०६

3706.
कामे पीडिलो माया । बहु मारी नाही दया ॥१॥
तुझ्या राहिलो आधारे । झाले अवघेचि बरे ॥धृपद॥
तुझे लागलो संगती । आता येतो काकुळती ॥२॥
तुका म्हणे तुझ्या भिडा । कान्होबा हे गेली पीडा ॥३॥

अर्थ :
मी काम (वासना)मुळे त्रासुन गेलो आहे. माया मला जन्ममृत्यूच्या दारात सारखी मारत आहे, तिला जराहि मया-दया नाही. देवा मी तुझ्या आधाराने राहिलो; त्यामुळे सर्वत्र चांगले झाले आहे. तुझ्या संगतिला आलो म्हणून काकुलतीला आलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, हे कान्होबा, तुझ्या भिड़ेमुळे आमची पीड़ा दूर गेली.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग