अंतरली खुटी मेटी । भ
3743.
अंतरली खुटी मेटी । भय धरूनिया पोटी । म्हणता जगजेठी । धावे करुणाउत्तरी ॥१॥
बाप बळिया शिरोमणी । उतावळि या वचनी । पडलिया कानी । धावा न करी आळस ॥धृपद॥
बळ दुनी शरणागता । स्वामी वाहो नेदी चिंता । आइतेचि दाता । पंगतीस बैसवी ॥२॥
वाहे खांदी पाववी घरा । त्याच्या करी येरझारा । बोबड्या उत्तरा । स्वामी तुकया मानवे ॥३॥
अर्थ :
संसाराचे भय मनी बाळगुण जे साधक 'जगजेठि' अशा भगवंताला आर्त स्वरात साद घालतात, त्यांच्या प्रपंच्याचे दुःख सरते. सर्व बलवानांमध्ये हा देव श्रेष्ट आहे. साधकांची आर्त हाक ऐकून तो उत्साहाने धाव घेतो. आळस करत नाही. शरण जाणार्यांना मोठे सामर्थ्य प्राप्त होते. माझा स्वामी साधकांना कसलिच चिंता पडू देत नाही. हा भगवंत साधकाला संतांच्या पंगतित बसवातो. तुकाराम महाराज म्हणतात, हा भगवंत साधकाला स्वताच्या खांद्यावर घेतो, त्याला कष्ट पडू देत नाही. स्वतः एरझार्या घालतो व त्याला नीजस्वरूपाच्या घाराला पोहचवितो. त्या भक्ताचे बोबडे बोल त्याला खुप आवडतात.
