वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

कोंडिला गे माज । निर

🙏 3. संत तुकाराम · ABH-079535 · अभंग क्र. ३७२०

3720.
कोंडिला गे माज । निरोधुनी द्वार । राखण ते बरे । येथे करा कारण ॥१॥
हा गे हा गे हरी । करिता सापडला चोरी । घाला गाठी धरी । जीवे माय त्रासाया ॥धृपद॥
तेचि पुढे आड । तिचा लोभ तिला नाड । लावुनी चरफड । हात गोउनी पळावे ॥२॥
संशयाचे बिरडे । याचे निरसले भेटी । घेतली ते तुटी । आता घेता फावेल ॥३॥
तुका येतो काकुलती । वाउगिया सोड । यासीचि निवाड । आम्ही भारवाहिका ॥४॥

अर्थ :
गोपी म्हणतात, हे सखयांनो हरीला आपण माजघरात कोंडू म्हणजे आपल्या ह्दयात कोंडून ठेवू व त्याचेच रक्षण करु तेच चांगले आणि हेच काम आता आपण करु या. तो पाहा तो पाहा तो हरी आपल्या घरी चोरी करताना सापडला आहे त्याच्या मायेला त्रास देण्याकरता आपण आता त्याच्यात व आपल्यात ऐक्य करुन घ्यावे. हा हरी काय करतो तर तो ज्या गोपीला ज्या गोष्टीचा लोभ आहे ती गोष्ट मायेच्या रुपाने तिच्यापुढे आणून ठेवतो आणि त्या गोष्टीविषयी प्रतिबंध करुन तिला नागवून सोडतो. ज्या गोष्टीमध्ये गोपीकेचा लोभ आहे त्या गोष्टीत तिचा हात गुंतवून ठेवतो आणि तिला तळमळ करायला लावतो व तेथून पळून जातो. पूर्वी हरी व आमच्यामध्ये जे संशयाचे बिऱ्हाड होते ते हरीच्या भेटीने पूर्णपणे नाश पावले आहे आता हरी नेहमी आमच्याजवळच राहाणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हाला काकूळतीला येत आहे हे माझ्या सखयांनो तुम्ही तुमच्या माथ्यावर संसाराचा व्यर्थ भार वाहू नका तुम्ही हरीशी संबंध ठेवा हरीशी संबंध ठेवला की तुमच्या संसाराचा भार नाहीसा होईल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग