आम्ही परात्पर देशी ।
3699.
आम्ही परात्पर देशी । कोणी नोखळतीआम्हांसी । ठाकुनी आलो संतांपाशीं । वेगी देईनिजसेवेसी ॥१॥ गवरी बाळसंतोष ॥धृ.॥ दोहातांचेंद्वैतदान । नेघे कोरडे कोरान्न । नमगे नमगे हेसाधन । अविट न विटे ते देई परमान्न ॥२॥ क्षीरसागरींची क्षीर घारी । विवेक गुळाची गुळवरी । पूर्ण परिपूर्ण देई पुरी । प्रबोध लाडू तयावरी ॥३॥ जीर्ण स्वरूपाचा शेला । कृपेनें दे का गा मजला । शुद्ध सत्त्वें निर्वाळला । निजबोधेउपार्जिला ॥४॥ नवखंडें खंडिलीं । जीवशिवेंविण सिविलीं । दे वोभक्तीची कांचोळीं । अंगी जीर्णत्वें बाणली ॥५॥ मोह ममतेचे बिरडे फोडी । शुद्ध सत्त्वाची गांठसोडी । त्रिगुणाची कसणी तोडी । जुनी कांचोळी देई रोकडी ॥६॥ पंचतत्त्वांचे अंगुलें । विषय भोगितां विटलें । वासना कसा जे तुटले । ते मज देई का वहिले ॥७॥ पंपच भोग गेलेभंगीं । तेचि दे गा अंगींचें अंगी । यालागी नाचतसेरंगीं । रंगी रंगलों श्रीरंगीं ॥८॥ नाही नाही कीम्हणसी येथे । आहे परिपूर्ण भरले जळतें । मी वोज्ञानार्थी क्षुधितें । अर्थे करी का समर्थे ॥९॥ ज्ञानदेतां धन न सरे । जो घे त्याचे दरिद्र विरे । मागतमागणें वोसरें । ऐसे धन दे का हो निधरिं ॥१०॥ एका जनार्दनी मागत दान । थीतें नेलें जीवपण । ।शेखीं नेदीच शिवपण । केले निज सुखसंपन्न ॥११॥ चिदानंदाचा निजस्वादु । नंदानंदाचा अनुवादु । निजनिजाचा उद्बोधु । एका जनार्दनी प्रबोधु ॥१२॥
