जनी वनी एक जनार्दन द
3725.
जनी वनी एक जनार्दन दाता । त्यासीनमन करू आता रे । मन उन्मन जयासी पहाता । त्याच्या चरणावरी माथा रे ॥१॥ जाचत पंढरीसीजाऊंरेखेळीया । क्षराक्षरातीत पाहू रे । टाळ मृदंगमेळवुनि मेळा । गुरूवचनी खेळ खेळा रे॥ध्रु॥भक्ती वैराग्य कुंडले श्रवणी । ज्ञानांकुशमुगुटमणीरे । सप्रेम उटी अंगी चंदनाची । सत्वाची कासनिर्वाणी रे ॥२॥ अष्टभावेंखेळिये खेळताती ठायी । घागऱ्या वाजती पायी रे । दया क्षमा दोन्ही चवऱ्याढाळती । शांती सत्रावी छाई रे ॥३॥ वाद निमालाशब्द खुंटला । त्रिभुवनी आनंद झाला रे । एकाजनार्दनीं शरण गेला । तो एकपण विसरला रे ॥४॥
