वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(काला)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079349 · अभंग क्र. ३७१६

3716.
(काला)
भोजनाच्या काळी । कान्हो मांडियेली आळी । काला करी वनमाळी । अन्नेएकवटा ।
देई निवडुनी । माते म्हणतो जननी । हात निपटून मेदिनी । वरी अंग घाली ॥१॥
कैसा आळी घेसी । नव्हे ते चि करीसी । घेई दुसरे तयेसी । वारी म्हणे नको ॥धृपद॥
आता काय करू । नये यासि हाणू मारू । नव्हे बुझाविता स्थिरू । काही करितांही ।
हातेची केले एके ठायी । आता निवडूनि खाई । आम्हा जाचितोसि काई । हरीसि म्हणे माता ॥२॥
त्याचे तयाकुन । करविता तुटे भान । तव झाले समाधान । उठोनिया बैसे ।
माते बरे जाणविले । अंग चोरूनि आपुले । तोडियले एका बोले । कैसे सुखदुःख ॥३॥
ताट पालवे झाकिले । होते तैसे तेथे केले । भिन्नाभिन्न निवडिले । अन्ने वेगळाली ।
विस्मित जननी । भाव देखोनिया मनी । म्हणे नाही ऐसा कोणी । तुज सारिखा रे ॥४॥
हरुषली माये । सुख अंगी न समाये । कवळूनि बाहे देती आळींगन । आनंद भोजनी ।
तेथे फिटलीसे धणी । तुका म्हणे कोणी । सांडा शेष मज ॥५॥

अर्थ :
एके दिवशी ताटात वाढलेली सर्व अन्नपदार्थ कृष्णने एकत्र कालविले आणी नतर हट्ट धरून म्हणाला, आई, हे एकत्र केलेले अन्नपदार्थ निवडून पूर्वी होते तसे दे; नाहीतर मी जेवणार नाही. असे म्हणून तो जमिनीवर लोळण घेऊ लागला. यशोदामाता म्हणाली, कृष्णा, तू भलताच हट्ट करतो आहेस. जे अशक्य आहे तेच करायला लावतो आहेस. अरे, वेगवेगळ्या पदार्थांचा काला केल्यानंतर ते पुन्हा पूर्वीसारखे कसे काय करता येईल ?. यशोदा म्हणाली, आता काय करावे ? त्याला मारू नये, याची समजुत घालावि. म्हणून समजूत घालत ती म्हणाली, "आपल्याच हाताने सर्व अन्नपदार्थ कालाविलेस, आता तूच ते नि

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग