मुका ३७२१
3721.
मुका ३७२१
मुका झालो वाचा गेली ॥धृ.॥ होते पंडित महाज्ञानी । दशग्रंथषडशास्त्र पुराणीं । चारीवेद मुखोद्गतवाणी । गर्वांमध्ये झाली सर्वहानी ॥१॥ जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करापक्वान्ना । निंदीले उपान्ना । तेणे पातलोमुखबंधना ॥२॥ साधुसंतांची निंदा केली । हरिभक्तांची स्तुती नाही केली । तेणे वाचा पंगुझाली । एका जनार्दनी कृपा लाधली ॥३॥
