वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 166. पोर ३७४३ ते ३७४४

आरता येरे धाकुट्या म

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090415 · अभंग क्र. ३७४४

3744.
आरता येरे धाकुट्या मुला । कशानेथोरपण तुला । उलीसेंच की रे दिसते पोर । ब्रह्मींनाही लहान थोर । तुला ब्रह्म ठाऊके आहे । सर्वांघटीं तेंचि पाहे । ब्रह्मी नाही भेदाभेद । ऐसेबोलती चारी वेद । तुझा भेद गळाला । सद्गुरुनेंबोध केला । भेद म्हणजे काय रे गड्या । आत्मस्वरूपपाही रे वेड्या । उलीसेच पोर चावट मोठे । थोरपण असून चहाड खोटे । माझे मन चहाडझालें । ज्ञानामुळे गर्वासी आले । गर्व जाईलकैशापरी । सद्गुरुचें दास्य करी । सद्गुरुकृपातुलाच झाली । भूतमात्रे भरूनि उरली । तरी कायएक एक नेलें । अविश्वासी बुडूनि मेले । विश्वासकाय साच केला । हा तो निश्चय पुराणी झाला । सद्गुरुविना तरेना प्राणी । सांगे तरला आहेकोण । भजन तरी करावे केव्हा । सोहं मंत्री नाहींगोंवा । जपावे तरी कोणे दिवशी । नेम नाहींदिवसनिशी । सद्गुरुसी शरण जाईना तरी । चौऱ्यांशींचे पडशील फेरीं । म्हातारपणी भक्तिकरूं । आयुष्य काय तुझे आज्ञाधारू । धाकटेपणींभक्ति केली । सद्गुरुची संगत जाहली । संगतीनेकोण कोण तरले । महापातकी उद्धरिले । पहिलेते कोळ्याचे पोर । अजामेळ चोखा महार । ऐसेतरले किती एक पोरा । मिती नाही रे गव्हारा । जाबास जाब फार देतोस । बोलू नये ते बोलतोस । उगाच रहा नाही तर देईन दोन काठ्या । अहंकाराहोशील खोट्या । तुझा माझा वाद झाला की रेफार । पांच पोरांनी घेतलें घर । पांच पोरें कोणाचीं । आत्माराम गड्याचीं । सारा खेळ त्याचाच कायरे । खेळ खेळुन निराळाच की रे । हा खेळ तुलाकशानें कळला । एका जनार्दन कृपें फळाशीआला ॥१॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग