वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

कवळाचिया सुखे । परब्

🙏 3. संत तुकाराम · ABH-079913 · अभंग क्र. ३६९८

3698.
कवळाचिया सुखे । परब्रम्ह झाले गोरखे । हात गोवुनि खाय मुखे । बोटासांदी लोणची ॥१॥
कोण जाणे तेथे कोण लाभ । का ते ब्रम्हादिका दुर्लभ ॥धृपद॥
घाली हमामा हुंबरी । पावा वाजवी मोहरी । गोपाळांचे फेरी । हरी छंदे नाचतसे ॥२॥
काय नव्हते त्या घरी खावया । रिघे लोणी चोरावया । तुका म्हणे सवे तया । आम्ही ही सोंकलो ॥३॥

अर्थ :
काल्याच्या घासाच्या सुखाच्या आशेमुळे परमेश्वर गुराखि झाला. तो घास हाती घेऊन, बोटाला लोणचे लाउन मुखात घालू लागला. देवांना दुर्लभ असलेला काला खाण्यात या परब्रम्हाला कृष्णाला कोणते सुख प्राप्त होते, ते कोणालाच कळत नाही. कृष्ण गोपाळ सोबत्यांबरोबर हमामा, हुंबरी असे खेळ खेळू लागला. सारे रिंगण धरून नाचू लागले. फेर धरून नाचु लागले. बासरी मोहरी वाजवून त्या छंदात गोपाल, कृष्ण नाचत होते. तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरिला घरात काही खायला मिळत नव्हते की काय? इतरांच्या घरात घुसून तो हावरेपणाने लोणी चोरून खातो. आम्हीही त्याच्या संगतीने लोणी चोरून खायला सोकावलो आहोत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग