वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

काल्याचिये आसे । देव

🙏 3. संत तुकाराम · ABH-079675 · अभंग क्र. ३७३२

3732.
काल्याचिये आसे । देव जळी जाले मासे । पुसोनिया हासे । टिरीसांगाते हात ॥१॥
लाजे त्यासि वाटा नाही । जाणे अंतरीचे ते ही । दीन होता काही । होऊ नेदी वेगळे ॥धृपद॥
उपाय अपाय यापुढे । खोटे निवडितो कुडे । जोडुनिया पुढे । हात उभे नुपेक्षी ॥२॥
ते घ्या रे सावकाशे । जया फावेल तो तैसे । तुका म्हणे रसे । प्रेमाचिया आनंदे ॥३॥

अर्थ :
काला खावून नदीच्या पाण्यात गोपाल हात धुतिल तेव्हा तरी त्या काल्याचे उष्टे आपल्याला मिळेल. या आशेने स्वर्गातील देव पाण्यात मासे बनून राहिले. हे त्यांचे कपट हरीने ओळखले, हरीने व सर्व गोपाळांनी उष्टे हात टिरीला (ढुंगनाला) पुसले आणि हसले. जे लाज धरून दूर बसले होते, त्यांना काल्यातील वाटा मिळाला नाही. हरी सर्वांच्या मनातील जाणतो. जे त्याच्या चरणी दिन होतात, त्याना आपल्यापासून दूर होउ देत नाही. त्याच्यापुढे उपाय हे अपाय होतात. खोटे कूड़े निवडून तो बाजूला काढतो. जे त्याच्यापुढे हात जोडून उभे राहतात त्यांची तो उपेक्षा करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या वाट्याला जे येईल, ते त्याने सावकाश घ्यावे आणि कृष्णच्या प्रेमरसात आनंदाने राहावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग