असोनिया दृष्टी जाहलो
3717.
असोनिया दृष्टी जाहलो मी आंधळा । आपांगीलें जिही जाहलो त्या वेगळा । मायबापमाझेम्हणती मजमाझ्या बाळा । शेवटींमोकलिती देतीहाती काळा ॥१॥ संत तुम्ही मायबाप माझी राखाकांही दया । लागतो मी वारंवार तुमचीयापायां ॥धृ.॥ इंद्रिये माझी न चलती क्षणभरीं । गुंतलोमायामोहेंया संसाराचे फेरी । अंथरूणघातलेंते इंगळाचे शेजेवरी । कैशी येईल निद्रा कोणसोडवील निर्धारी ॥२॥ मायबाप तुम्ही संत उपकारकरा । जगी जो नांदतों जनी एवढा जनार्दन तोखरा । तयाचिया चरणांवरीमस्तक निर्धारी । एकाजनार्दनी करी विनंती अवधारी ॥३॥
