(लखोटा)
3694.
(लखोटा)
लये लये लखोटा । मूळबंदि कासोटा । भावा केले साहे । आता माझे पाहे ॥१॥
हातोहाती गुंतली । जीवपणा मुकली । धीर माझा निका । सांडी बोल फिका ॥धृपद॥
अंगीकारी हरी । नको पडो फेरी । लाज धरी भांडे । जग झोडी रांडे ॥२॥
बैस भावा पाठी । ऐक माझ्या गोष्टी । केला सांडी गोहो । धरी येथे मोहो ॥३॥
पाठिमोरा डोल । आवरी ते बोल । पागलीस बाळा । पुढे अवकळा ॥४॥
आता उभी ठायी । उभाउभी पाही । नको होऊ डुकरी । पुढे गाढव कुतरी ॥५॥
नामा केले खरे । आपुले म्या बरे । तुका म्हणे येरी । पागविल्या पोरी ॥६॥
अर्थ :
सामाधिअवस्थेपर्यंत पोहचलेली एक स्त्री आपल्या प्रपंच्यासक्त मैत्रीणीला म्हणते, मळबंधनाच्या जागी मी कासोटा घातला आहे. भक्तीभावाचे सहाय्य केले आहे. आता माझ्याकडे बघ. हा (लाखेने चिटकाविलेले एकीकरण झालेला) लाखोटा मी घेतला आहे. यमनियम इत्यादि अंगाचा अभ्यास करता करता सहजच अगदी हातोहात माझी वृत्ती हरिच्या ठिकाणी गुंतली, जीवपणाला ती वृत्ती मुकली, माझे हे धाडस चांगलेच आहे. तेव्हा हे सखी, क्रियेविण असलेला तुझा हा वाचाळपणा सोडून दे. मझ्यासारखा तुही हरिनामाचा अंगीकार कर. जन्ममरणाच्या फेऱ्यात उगीच पडू नकोस. अंग भांडखोर, नीर्ल्लज बाई, थोडितरि लाज बाळाग. नावर्याला (संसार) सोडून दे आणि भक्तिभाव मनात बाळगुण, भगवंताचा मोह बाळग. अग पुरे, बडबड बंद कर. पाठमोरी हो. तू ऊगीचच पागली आहेस, पहा, नाहीतर तुला पुढे अवकळा प्राप्त होईल. तू आहे ईथेच उभी रहा; उभ्या उभ्या देवाला पहा. डुक्कर, गाढव, कुत्री अशी पुढे जन्म घेऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, अग सखी, मी नामामुळे कल्याण करूण घेतले. इ
