वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

पैल आली आगी कान्हो क

🙏 3. संत तुकाराम · ABH-079713 · अभंग क्र. ३७२७

3727.
पैल आली आगी कान्हो काय रे करावे । न कळे ते कैसे आजि वांचो आम्ही जीवे ॥१॥
धाव रे हरी सापडलो संधी । वोणव्याचे मधी बुद्धि काही करावी ॥धृपद॥
अवचिता ज्वाळा येता देखिल्या वरी । परतोनि पाहता आधी होतो पाठमोरी ॥२॥
सभोवता फेर रीग न होय पळता । तुका म्हणे जाणसी ते करावे अनंता ॥३॥

अर्थ :
एक दिवस कान्होबाबरोबर सर्व गोपाळ रानात गाई चरत असताना अचानक रानात वनवा पेटला आणि सारे गोपाळ घाबरुन कान्होबाला म्हणाले हे कृष्णा पलीकडे पाहा सर्वत्र आग लागली आहे आता आम्ही आमच्या जीवाला कसे वाचवावे ते काही काय आम्हाला कळत नाही. हे हरी तू आमच्या मदतीला लवकर धाव या वनव्यात आम्ही सापडलो आहोत व त्या वनव्यामध्ये काय करावे याविषयी आमची बुध्दीच चालत नाही. मी थोडया वेळापूर्वी पाहिले तर त्या ज्वाळा आपल्यापासून खूप दूर अंतरावर होत्या परंतू अचानक मी पाठीमागे वळून पाहिले तर त्या ज्वाळा अगदी आपल्याजवळ जवळ येताना मला दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्याला या वनव्याने चारही बाजूने घेरले आहे आता पुढे पळून जाण्यासही जागा राहिली नाही यावेळी हे अनंता काय करावे हे तुलाच कळते आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग