वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 155. शकून ३७२६ ते ३७२८

शकून ३७२६ ते ३७२८

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087365 · अभंग क्र. ३७२६

3726.
शकून ३७२६ ते ३७२८

कैकाय कैकाय तुज सांगते शकुन । येणे मार्गे गेले नाही आले परतून । आरता येई तुजसांगतें शकुन । वरल्या देशींची वस्तु एकनिधान ॥१॥ हिंडत कैकाय तिचा घरी भ्रतारू । सांवळा डोळस माथा दुडियाचा भारू । एकुले एकतिचे कडीये लेकरूं । भुरळ घालुनी भुलविले नारीआणि नरू ॥२॥ भूरभंगी धूर धुमाळी । गेली चारीयुगे । आता येईल तुज एक निजखूण सांगे । चौऱ्याऐंशी सिद्ध गेले येणे मार्गे । नारद तुंबर ऋषीतेही गेले भंगे ॥३॥ ब्रह्मा विष्णू रूद्र तेही काळेग्रासिलें । सीतापती पुरंदर चंद्रमावळले । सव्वालक्षघडामोड मायासूत्र खेळे । परिसा पहाता पिंडब्रह्मांड आगळे ॥४॥ बोलती कैकाय भूर होईलगादादा । लटिकाची माया मोह लावियेला धंदा । लक्षामध्ये जाणे भेद विरळा एखादा । यालागी चिंतीदिननिशीं परमानंदा ॥५॥ बोले कैकाय दादा उद्या

3727.
जे निर्गुण निराकार तेथे माझा वास । कांही सांगावया आले तुम्हांस । माझाशकुन ऐकती
ब्रह्मा विष्णू महेश । ऐशी एक खूण सांगितलीत्यांस ॥१॥ कैकाय कैकाय निर्गुणपुरीचा ठाव । सांगावया शकुन आले ऐक्यभाव । ऐकामाझा शकुनपुन्हा जन्मा न यावे । चाड जया असेल तेणे चित्तद्यावें ॥२॥ शकुनाची खूण बाणे प्रल्हादा । त्याच्यापितीयाने केली बहु आपदा । मज ते न पहावे मीधावले दादा । धरूनी हिरण्यकश्यपुसी केलासेचंदा ॥३॥ शकुन सांगितला म्या लंकाभुवनी । परीतो नायके उन्मत्त बोले वाणी । धरूनी म्या केलाचेंदा रणांगणी । स्थापियेला बिभीषण राज्यभुवनीं ॥४॥ बैसोनी अर्जुन रथी सांगितली खूण । कौरव आणि पांडवांचे माजलेरण । अठरा दिवसांतकरविले कंदन । शेवटी रक्षीलें पंडूचे नंदन ॥५॥ शकुन सांगत मी आले मी गोकुळाप्रती । अगबगचाणूर मारिले दुर्मती । वधियेला मामा कंसासुरपापमती । विष पाजूं आली मावशी तिसी सायुज्यमुक्ती ॥६॥ शकुन सांगत आले भीवरा तीरा । तंवतेथे देखिला परात्पर सोयरा । मध्यस्थळी शोभेपुंडलीक बरा । एका जनार्दनी चुके जन्माचाफेरा ॥७॥

3728.
निर्गुण निराकार दादा माहुरमाझे गाव शकुन सांगावया आले यमाईमाझे नांवा तये नगरीवस्ती केली मी तरी आले एकभावे । ऐसा माझाशकुन दादा चित्त देउन ऐकावे ॥१॥ कैकाय कैकायजीबाबा दुरील माझा देश । शकुन सांगावया मी आलेकलियुगास । ब्रह्मा विष्णु महेश पुसती शकुनआम्हांस । ऐसे निदान आम्ही सांगितले त्यांसा२॥धरित्री आकाशमज देखतांउत्पत्ती । चंद सुर्य दादामज देखता होती । ब्रह्मा विष्णु महेश मज देखतांउपजतीं । जेथे आहे शिव तेथे आदिशक्ति ॥३॥ दाही अवतार मजदेखतांझाले । अकराहीरुद्र दादाहोउनीयां गेले । अठ्याऐंशी सहस्त्र ऋषी मजदेखतांजन्मले । ब्रह्मादी तेहतीस कोटी देवखेळविले ॥४॥ अठ्ठाविस युगे झाली चक्रवर्ती । कौरव पांडवगेलें दादा नेणो कीती । छपन्न कोटी यादव गेलेदादा कोणे पंथी । आम्ही तुम्ही जाउंमागे कोणीनरहाती ॥५॥ पृथ्वीमध्ये दादा एक विपरित होईल । बहीण भावां दोघाजणांचा विवाह लागेल । पाचावरुषांची बाळा भ्रतार मागेलासहा वरुषांची नारीगर्भिन होईल ॥६॥ आणिक दादा माझा ऐकावा बोल । पृथ्वीवरता वारा थोर झुंजाट सुटेल । थोर थोरदादा पर्वत उडोनी जातील । अठराही जाती एकेठिकाणी जेवतीला।७॥कलियुगाची दादा ऐकावीथोरी । पुत्र तोहोईल पित्याचा वैरी । भ्रतारा सोडोनीघरोघरी फिरतील नारी । ऐसा माझा शकुन दादाऐका निर्धारी ॥८॥ आणिक एक दादा माझं ऐकाउत्तर । आकार जाईल अवघा होईल निराकार । जाती चंद्र सुर्य मग पडेल अंध:कारधरित्री आकाशजाईल मग कैंचा दिनकर ॥९॥ आणिक एक शकुनमाझा ऐकावा संती । तुम्ही मुळपीठी राहणे माझेनाव आदिशक्ती । अंबेचा व्यवहार त्राहे त्राहेआदिमुर्तिी एका जर्नादनी प्रसन्न झाली आदिशक्ती ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग