वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 147. वासुदेव ३७०२ ते ३७०९

सुखे सेऊ ब्रह्मानंदा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090390 · अभंग क्र. ३७०४

3704.
सुखे सेऊ ब्रह्मानंदा । गाऊ रामनामसदा । नोहे मग बाधा । काळदूत यमाची ॥१॥ करू वासुदेव स्मरण । तेणे तुटे रे बंधन । खंडेलकर्माचें वदन । वासुदेव जपतांची ॥२॥ तीर्थयात्रेसुखें जाऊ । वाचे विठ्ठलनाम घेऊ । संतासंगें सेऊ । वासुदेव धणीवरी ॥३॥ लोभ ममता दवडूं आशा । उदरव्यथेचा वोळसा । न करू आणिक सायासा । वासुदेवावांचुनी ॥४॥ मुख्य वर्माचे हे वर्म । येणेसाधे सकळ धर्म । एका जनार्दनी नाम । वासदेव
आवडी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग