वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

आजि ओस अमरावती । काल

🙏 3. संत तुकाराम · ABH-079645 · अभंग क्र. ३७३४

3734.
आजि ओस अमरावती । काला पाहावया येती । देव विसरती । देहभाव आपुला ॥१॥
आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी । तटस्थ त्या ध्यानी । गाई जाल्या श्वापदे ॥धृपद॥
जे या देवांचे दैवत । उभे आहे या रंगांत । गोपाळांसहित । क्रीडा करी कान्होबा ॥२॥
जया सुखाची शिराणी । तीच पाऊले मेदिनी । तुका म्हणे मुनी । धुंडितांही न लभती ॥३॥

अर्थ :
स्वर्गातील इंद्राची अमरावती आज ओस पडली. काला पाहण्यासाठी सर्व देव अंतरीक्षात जमले. देहहभान विसरून काल्याचा सोहंळा पाहू लागले. काल्याचा आनंद पृथ्वीवरती मावेनासा झाला. गाई गुरे चारा खान्याचे, पानी पिण्याचे विसरून गेली. हिंस्र प्राणी कृष्णच्या ध्यानाने तटस्त बसले. इंन्द्रादिक देवांचे आराध्य दैवत काल्याच्या सोहंळ्यात उभे होते. श्रीकृष्ण गोपाळांच्या समवेत अनेक लीला करीत होता. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व सुखांचा शिरोमणि अशी, वृषिमुनींनी शोध करुणही ज्यांची प्राप्ति होत नाही, अशी श्रीकृष्णचि सुकुमार पावले काल्याच्या प्रसंगी पृथ्वीवर होती.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग