वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(काला)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079484 · अभंग क्र. ३७१५

3715.
(काला)
कान्होबा तू आलगट । नाही लाज बहु धीट । पाहिले वाईट । बोलोनिया वोखटे ॥१॥
परि तू न सांडिसी खोडी । करिसी केली घडीघडी । पडिसी रोकडी । तुटी माये आम्हासी ॥धृपद॥
तू ठायीचा गोवळ । अविचारी अनर्गळ । चोरटा शिंदळ । ऐसा पिटू डांगोरा ॥२॥
जरी तुझी आई । आम्ही घालू सर्वा ठायी । तुका म्हणे ते ही । तुज वाटे भूषण ॥३॥

अर्थ :
हे कान्होबा, कृष्णा तू फार खोडकर आहेस. तुला लाज नाही. तू अतिशय धीट आहेस. तुला आम्ही खुप वाइट-साइट बोलून पाहिले. परंतु तू काही आपला खोडकर स्वभाव बदलत नाहीस. पुनःपुन्हा त्याच खोडया करतोस आणि आमच्या अविद्यांचा नाश करतोस. हे देवा, तू गुराखी आहेस आणि अविचारी, आडदांड, चोरटा, शिंदळ आहेस, असा डांगोरा आम्ही जगभर पिटवु. तुकाराम महाराज म्हणतात, तुझे शारीर निर्माण करणारी मायारूपी आई, तिचा सर्वाणी उपभोग घेतला, तरी देखिल तुला त्याचे भूषण वाटते, इतका तू निलाजरा आहेस.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग