वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

भिऊ नका बोले झाकुनिय

🙏 3. संत तुकाराम · ABH-079646 · अभंग क्र. ३७२८

3728.
भिऊ नका बोले झाकुनिया राहा डोळे । चालवील देव धाक नाही येणे वेळे ॥१॥
बाप रे हा देवाचा ही देव कळो । नेदी माव काय करी करवीतो ॥धृपद॥
पसरूनि मुख विश्वरूप खाय ज्वाळ । सारूनिया संधी अवघे पाहाती गोपाळ ॥२॥
तुका म्हणे आम्ही मागे भ्यालो वायाविण । कळो आले आता या सांगाते नाही शिण ॥३॥

अर्थ :
कान्होबा सवंगडयांना म्हणाला, की तुम्ही भीउ नका. आपल्यावर हे आगिचे संकट विश्वात्मक शक्ति निवारेल. घाबरुन जाऊ नका. डोळे मिटुन स्वस्त रहा. बाप रे ! हा तर देवाचाहि देव आहे. काय करील आणि काय घडवून आनेल हे तर कोणालाच समाजु देणार नाही. त्याने विश्वरूप दाखवले आणि वनव्याचा अग्नी भक्षण करू लागला. बाकीचे सारे गोपाळ बोटांच्या फटीतून पाहत होते. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विनाकार घाबरलो होतो. या कान्होबाच्या सहवसात असल्यावर कसलिहि भीति वाटत नाही, कसलाही शीन होत नाही. हे आज कळुन आले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग