वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

चला बाई पांडुरंग पाह

🙏 3. संत तुकाराम · ABH-079761 · अभंग क्र. ३७३५

3735.
चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी । मांडियेला काला भोवती गोपाळांची दाटी ॥१॥
आनंदे कवळ देती एकामुखी एक । न म्हणती सान थोर अवघी सकळिक ॥धृपद॥
हमामा हुंबरी पावा वाजविती मोहरी । घेतलासे फेर माजी घालुनिया हरी ॥२॥
लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुयाती । विसरली देहभाव शंका नाही चित्ती ॥३॥
पुष्पाचा वरुषाव झाली आरतियांची दाटी । तुळसी गुंफोनिया माळा घालितील कंठी ॥४॥
यादवाचा राणा गोपीमनोहर कान्हा । तुका म्हणे सुख वाटे देखोनिया मना ॥५॥

अर्थ :
बायांनो, चला चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊ तेथे पांडुरंगाला पाहू गोपाळांचा मेळा तिथे भरला आहे. काल्याचा खेळ मांडला आहे. ते एकमेकांना काल्याचा प्रासादिक घास भरवत आहेत. आपला मोठेपणा विसरून सारे आनंद लहरित नाचत आहेत. श्रीकृष्णला मध्य भागी बसवून सर्वांनी त्याच्यासोबत फेर धरला होता. हमामा, हुंबरि असा खेळ चालला होता. श्रीकृष्ण मधे बासरी वाजवित होता. त्या खेळात सर्व स्त्री - पुरुष लुब्द्ब झाले होते. पशु-पक्षीहि देहभान विसरले होते. त्यांच्या अंत:करणात कसलिच शंका उरली नव्हती. पुष्पवृष्टि चलली होती. आरती करणार्यांची प्रचंड गर्दी जमली होती. त्यानी गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या होत्या. तुकाराम महाराज म्हणतात, यादवाचा राजा, गोपीजन-गोपी यांचे हरन कारनारा कान्होबा - त्याला पाहुन माझ्या मनालाही मोठे सुख प्राप्त झाले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग