देही धर्म विहित करी
3165.
देही धर्म विहित करी । अद्वैत भाव चित्ती धरी । सर्वभावे नमस्कारी । एक आत्मा म्हणोनी ॥१॥
तेणे तुटे रे बंधन । वाचे जपे जनार्दन । आणिक नको रे साधन । रामकृष्ण स्मर सुखें ॥२॥
पवित्र त्याचे हे कुळ । आचार त्याचाचि सुशीळ । अखंड जे सर्वकाळ । नाम जपती ॥३॥
एका जनार्दनी नाम । परब्रह्मा ते निष्काम । हरे भवश्रम । जन्मजराव्याधी ॥४॥
